आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेदनिकेतन

 आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेदनिकेतन

नाशिक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भक्तनिवास, गंगेश्वर वेदनिकेतनचे शिलान्यास भूमिपूजन संपन्न झाले. गरीब गरजूंना मोफत आरोग्य सुविधा निर्माण करून देणार असल्याचे विश्वस्त ईश्वर थदानी यांनी यावेळी सांगितले.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उदासीन गंगेश्वर जनकल्याण ट्रस्टच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे भाविकांसाठी भक्तनिवास तसेच गंगेश्वर वेदनिकेतनचे भूमिपूजन आणि शिलान्यास समारंभ संपन्न झाला. शिलान्यास प्रसंगी स्वामी भास्करानंद, स्वामी निर्मलादास, स्वामी विवेकानंद, स्वामी ओमेश्वरांनंद, विश्वस्त ईश्वर थडानी तसेच भक्तगण उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर मधील पुरोहित वर्गाच्या मंत्रोच्चाराने धार्मिक विधी पार पडला, त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्व लक्षात घेवून भाविकांकरिता मोफत निवास आणि भोजन व्यवस्था केली जाणार असून ३० प्रशस्त खोल्या भव्य भोजनकक्ष, स्वच्छता गृह, भजन कीर्तन ,अध्यात्मिक कार्यकरिता सभागृह अशी व्यवस्था असणार आहे.

कुंभमेळ्यापूर्वी सदरचे भवन भाविकांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती विश्वस्त ईश्वर थडाणी यांनी दिली, मागील कुंभमेळा काळात गंगेश्वर जनकल्याण ट्रस्टने दान स्वरूपात जागा दिली होती. ट्रस्टच्या वतीने कुंभमेळा काळात अन्नछत्र आणि विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, गरीब गरजूंना मोफत आरोग्य सुविधा निर्माण करून देणार असल्याचे विश्वस्त ईश्वर थदानी यांनी यावेळी सांगितले.

नाशिक शहरातील वेद मंदिर येथे ट्रस्टचा आश्रम असून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत औषध उपचार, तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्यतून मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया, गो शाळा,वयोवृद्ध , गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ गावाला दत्तक घेवून गावासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा सामाजिक सभागृह आदी उपक्रम राबविले जात आहेत. Vedaniketan in the wake of the upcoming Kumbh Mela

ML/KA/PGB
10 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *