मतदान जागृतीसाठी वासुदेव करताहेत दारोदारी प्रचार
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदार जागृती करण्यासाठी चक्क वासुदेव वस्त्या वस्त्यांमधून आणि रस्तो रस्ती प्रचार करीत फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पारंपरिक गीते , भारुडे आणि अभंगांच्या माध्यमातून ते मतदान करणे कसे महत्त्वाचं आहे याचा सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
या मतदासंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी ही संकल्पना राबवून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या डोंबिवलीत हा प्रयोग करण्यात येत आहे. डोंबिवली मतदारसंघात गेल्या वेळी जेमतेम चाळीस टक्के मतदान झालं होतं,ते वाढविण्यासाठी रहिवासी संकुले , वस्त्या यात हे वासुदेव आपली कला सादर करीत मतदार जागृती करणार आहेत. Vasudev conducts door-to-door campaign for voter awareness
ML/ML/PGB
3 Apr 2024