श्री महालक्ष्मी तसेच ज्योतिबा मंदिरात वस्त्र संहिता लागू

 श्री महालक्ष्मी तसेच ज्योतिबा मंदिरात वस्त्र संहिता लागू

कोल्हापूर दि १४– कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई तसेच पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास
मनाई करण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाविकांना सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महालक्ष्मी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. सुट्टी अन् सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक महालक्ष्मी अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. याआधी भाविक जीन्स अन् वेगवेगळा पेहराव करुन मंदिरात प्रवेश करत होते. मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता, पारंपरीक पध्दतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई /
महालक्ष्मी देवस्थान तसेच केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा इथं काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करतात.

काही मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेसकोड करण्यात आलेला आहे. करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण शक्तीपीठ असून या मंदिराचे महत्व फार आहे. तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता, पारंपारीक पध्दतीने कपडे परिधान करावे, मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करुन व त्याचे पालन करुन पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे आणि सुचनांचे पालन करुन देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे असे आवाहन
करण्यात आले आहे.

ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *