संततधार पावसामुळे वाशीमच्या संगमेश्वर प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा

वाशीम दि २४:– वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये जलसाठा वाढताना दिसत आहे. विशेषतः वाशीम तालुक्यातील वारा जहागीर येथील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तब्बल १०० टक्के भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील उमरा मोठा, वारा, देपुळ, बोरी, काजलांबा, कुंभी, वसंतवाडी आदी १५ गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले असून, येणाऱ्या हंगामात शेती भरभराटीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसामुळे पाणीसाठा वाढल्याने आता या भागाला दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल होईल, अशी स्थानिकांची आशा आहे. ML/ML/