वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतीचे नुकसान; शेतकरी मेटाकुटीस

वाशीम दि २३– जिल्ह्यात रिसोड, मालेगांव, मंगरूळपिर तालुक्यात काल दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर आला. या भागातील हजारो हेक्टर शेती पुराच्या विळख्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील काच आणि पैनगंगा आणि मालेगाव तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील दोन वेळा याच नदीच्या पुरामुळे शेती उध्वस्त झालेली असतानाही, शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून आपल्या पोटाची भ्रांत मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तिसऱ्यांदा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे. ML/ML/MS