वाशीम जिल्हात उन्हाळी मुगाचे क्षेत्र वाढले

वाशीम दि १५:– वाशीम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं असून सरासरीपेक्षा २९७ हेक्टर वर जास्त पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलीये. वाशीम जिल्ह्यात सरासरी १हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मुगाची पेरणी अपेक्षित होती. मात्र यामध्ये वाढ झाली असून यावर्षी १ हजार ६१२ हेक्टर वर उन्हाळी मुगाची पेरणी झालीये. मूग हे कमी कालावधी चांगलं उत्पन्न देणारं पीक असल्यानं सिंचनाची सोय असलेले बहुतांशी शेतकरी उन्हाळ्यात मुगाच्या पेरणीला पसंती देतात.