वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

 वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना देण्यात येणारे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार , दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली येथील दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त मायी यांचे हस्ते या पुरस्कारांचे वितरण व स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. 1 लाख रुपये सामाईक पुरस्कार तर अन्य 12 कृषी संस्थाना 35 हजार रुपये,शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. अशी माहिती वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व सचिव दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा हे पुरस्काराचे 36 वर्ष असून, यावर्षीचा वसंतराव नाईक कृषि सामाईक पुरस्कार विदर्भ नेचर कॉन्झरवेशन सोसायटी काटोल या संस्थेला जाहीर झाला आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापिठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (कृषी पुरस्कार),डॉ. प्रकाश शामराव नाईक
(कृषि साहित्य पुरस्कार),सुदर्शन मोहनदास सुतार (कृषि पत्रकारिता पुरस्कार),श्रीमती संगीता बोरस्ते (कृषि निर्यात पुरस्कार),
मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (कृषि फलोत्पादन पुरस्कार),भाजीपाला पुरस्कार (लोकप्रबोधन संस्था सोलापूर ),पशुपालन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (श्रावणी महिला स्वयंसाह्यता महिला बचत गट कोल्हार खुर्द, तालुका राहूरी, जिल्हा- अहमदनगर),डॉ. दत्ता गणेश देशकर (जलसंधारण पुरस्कार),अनिल मार्कसराव पाखरे (पर्यावरण पुरस्कार),प्रसाद सावे (आधुनिक फुलशेती पुरस्कार),आधुनिक कृषि यंत्र निर्मिती पुरस्कार (ॲग्रोयुझर पॉवर्स व इनोव्हेशन अकोला),तर दत्ता विठ्ठल माळी (आधुनिक कृषि निर्यात पुरस्कार) यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
असे राजेंद्र बारवाले व दीपक पाटील यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *