वसंत हरियाण विशेष जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. ३० : दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा जीवनप्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित लघुपट सेवावृत्तीचा विशेष प्रिमियर शो तसेच वृत्तपत्र चळवळीच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा विशेष जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ धुरू हॉल दादर येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रास्ताविक मराठी वृत्तपत्रलेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांनी करून संस्थेची तसेच कार्यक्रमाची माहिती सादर केली, याप्रसंगी ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक वसंत हरियाण, रमेश सांगळे, मंदाकिनी भट व पास्कोल लोबो यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव सन्मान पुरस्कार, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शैलेष मोहिते, डॉ. विवेक पै, डॉ. हेमंतराज गायकवाड, डॉ. प्रविण बांगर, शुभदा कामथे, राजन देसाई, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री इत्यादी मान्यवरांचे आभार नितीन कदम यांनी मानले, तर कार्यक्रमाचे संयोजन सुनील कुवरे आणि दिगंबर चव्हाण यांनी केले.ML/ML/MS