वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी.
वसई दि २५ : विरार वसई च्या वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 80 महिला संक्रांतीच्या व वसंत पंचमीच्या हळदी कुंकू समारंभात सहभागी झाल्या. याने वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना एकमेकींच्या गाठीभेटी घेण्याचा योग आला. त्यांनी फुगडी आदि विविध खेळ केले. महिलांनी उखाणे घेतले. पोवाडे, वीर गीते,गाणी म्हटली.
आज समाजाचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून वैद्यकीय क्षेत्रात अनेक महिला आपले योगदान देत आहेत. विशेष म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात या क्षेत्रात झोकून देताना सर्व महिलांना आई , बहीण, आजी अशा विविध भूमिकेत त्या सेवा देतात हे निर्विवाद सत्य आहे. अशावेळी एक विरंगुळा म्हणून या कार्यक्रमाला विविध महिलांनी आपुलकीने प्रतिसाद दिला. यावेळी
वैद्यकीय सेवा देताना येणाऱ्या विविध समस्यांबद्दल चर्चा झाली. मात्र समस्यांच्या पलीकडे जाऊन या महिलांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा दिली आहे हे नक्कीच.
या प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी झाल्यास समाजाचे आरोग्य सुधारेल यात शंका नाही. एक अभ्यास सांगतो की निरोगी सुखी दीर्घायुषी कोण? ज्याला खूप मित्र आहे तो. हळदी कुन्कवासारखे सर्व सामाजिक कार्यक्रम सर्वांना एकत्र आणतात. सर्वाना सुखी करतात. “हा कार्यक्रम सातत्याने साजरा करण्यात विरार येथील जोशी बाल रुग्णालयाने पुढाकार घेतला. वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी स्वतःच्या सौभाग्या बरोबर समाजाचेही सौभाग्य राखावे” असे सांगून सहभागी झालेल्या सर्व महिलांचे डॉक्टर अर्चना जोशी यांनी आभार मानले.ML/ML/MS