वर्षा ताईच्या नेतृत्वात मला काम करायला आवडेल- भाई जगताप
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईत आधी भाई होते आता ताई आहेत आणि माझ्या बहिणीच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल असे मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मांडले.मुंबई काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान वर्षाताई गायकवाड यांना मिळाल्याने मला मोठा आनंद झाला असून त्यांच्यानेतृत्वात आम्ही पूर्ण क्षमतेने आगामी निवडणुका लढू असे स्पष्ट करताना माझ्या बाबतीत प्रसार माध्यमात आलेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्या विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे माझ्यावर कारवाई झाली हे मात्र खरे नाही. कारण चंद्रकांत हंडोरेना योग्य कोटा दिला होता. या निवडणुका सरळ सोप्या नसतात. त्यांचा पराभव झाल्याचे मला दुःख झाल्याचे मी तेंव्हाच म्हटले होते.मला मी जिंकल्याचा आनंद नसून दुःख आहे, आजही मला दुःख आहे पण आमच्या काही लोकांनी गडबड केल्याचे मान्य आहे. त्याची चौकशी सुरु आहे.भाई जगताप पुढे म्हणाले की, दलित महिलेला अध्यक्षपद दिले असे काहीहि नाही. काँग्रेस मध्ये जातपात मानली जात नाही. धारावीच्या आमदार वर्षाताई यांच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा म्हणून नियुक्तीचा मला अभिमान आहे. पहिल्यांदा एका महिलेला मुंबईचे अध्यक्ष पद मिळाले हेच फार महत्वाचे आहे. माझ्या 2 वर्षे 7 महिने अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वात मोठी म्हणजे 8 लाख 82 हजार सदस्य नोंदणी झाली असून तो एक रेकॉर्ड आहे.तत्पूर्वी संजय निरुपम यांच्या काळात तिचं सदस्य नोंदणी 4 लाख होती.याकडे भाईंनी लक्ष वेधले.20 मार्च 21 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोखण्यासाठी देशभरात लोकडाऊन लागू केला, मुंबईच्या 36 विधानसभा क्षेत्रात लोकांना शिधा वाटप केला.कोरोना काळात आम्ही आमच्या 6 जिल्ह्यात कार्डीयाक ऍम्ब्युलन्स देऊन गरिबांना मोठा आधार दिला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार परवडणारे नव्हते त्यांची उत्तम सोय सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयात केली.5 -5 हजार व्हेक्सीनेशन चे वाटप केले, 3 दिवसीय शिबिर घेतले तसेच पनवेल लाही घेतले. पेट्रोल डिझेल भाववाढी वर 227 वार्डात आंदोलन केले.यांत ब्लॉक अध्यक्ष, विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मोठे योगदान लाभले.आम्ही बजेट अधिवेशनानंतर वाढलेल्या महागाई विरोधात आंदोलन केले.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुंबईत आल्यावर त्यांना दादर येथे 2 तास अडवून ठेवले.अर्थ संकल्पत जनतेच्या प्रश्नावर हे आंदोलना केले होते.27 फेब्रुवारीला आम्ही मुंबईत सर्वात मोठी शिवजयंती साजरी केली. पालिकेने गत साली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचे 95 % काम पूर्ण झाल्याचे जाहिर केल्यानंतर आम्ही मुंबईभर सर्वे केला तेंव्हा अवघे 27 % काम झाल्याचे सिद्ध झाले.काँग्रेसचा संकल्प आहे कि मुंबई करांना मोफत पाणी मिळावे,500चौरस फूट घरे लोकांना मिळावीत या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.पालिकेच्या रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याचे कळल्याने रुग्णालययांत ऑपरेशन होऊ शकत नाही म्हणून आम्ही महा रक्तदान शिबिर घेऊन 10 हजार युनिट रक्त जमा करून सरकारी रुग्णालयात दिले मुंबई कराना मुंबईकरांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.कोरोना काळात पोलीस रस्त्यावर होते अशा 10 हजार पोलिसांना टूलकीट दिले.कोकणात वादळात लोकांचे मोठे नुकसान झाले.त्यांना आम्ही एक कोटीची मदत केली.मुंबईत तिरंगा यात्रा यशस्वी केल्या.19 जून 2021 ला राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई सारख्या ठिकाणीही असलेल्या 12 हजार कुपोषित बालकांपैकी 1 हजार कुपोषित बालकांना दत्तक घेऊन सामाजिक जबाबदारी पार पडली.प्रियंका गांधी यांनी टास्क दिला होता. लडकी हूँ लड सक्ती हूँ हे अभियान आम्ही मुलींच्या मेरेथॉन रेस च्या माध्यमातून पूर्ण केले.सकाळी 6 वाजता 5500 मुली मुंबईत धावल्या हा मोठा विक्रम केला.अवघ्या 7 दिवसात आम्ही हि मेरेथॉन यशस्वी केली.राहून गांधी यांना समन्स झाली तेंव्हा आम्ही सातत्याने तीन दिवस आंदोलने केली.मुंबईचा सर्वसामान्य कार्यकर्ता नोकरी सांभाळून आंदोलन सहभागी झाले होते याचा फार अभिमान वाटला.शेतकरी आंदोलनात सहभागी होतो आमचा फार मोठा वाटा होता.अदानी यांनी एलआयसी चा पैसा लुटला,44 हजार कोटींची लूट केली, एसबीआय कडून कोटयावढी रूपये अडाणीला दिल्यावर आम्ही आंदोलने केली.अदानी यांच्या फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले असा आरोप करीत त्यावर आम्ही आंदोलन केल्याचे भाई जगताप पुढे म्हणाले.सहारा एअरपोर्ट येथील झोपडी वासियांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.असे म्हणत आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीचा पाढा वाचला.
ML/KA/PGB 12 Jun 2023