ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम

पुणे, दि ३०: गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो.
पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा हा देखावा भक्तांच्या मनात अध्यात्माची नवी जागृती करतो. संस्कृती व अध्यात्माचे सुंदर मिश्रण असलेला हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
परदेशी परिवाराने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून, ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेचा हा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पत्ता : ६१४,शुक्रवार पेठ ओरिएंटल कॉम्प्लेक्स ४था मजला शाहू चौक गणपती मंदिरा शेजारी,पुणे
मोबाईल नंबर ९८२३११२३२३. KK/ML/MS