वर्धाजिल्ह्यात लाल नाला प्रकल्पात पाणी पातळी वाढली

वर्धा दि ९ — वर्धा जिल्ह्याच्या लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे, ROS नुसार जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता कार्यकारी अभियंता,चंद्रपुर पाटबंधारे विभाग,चंद्रपुर यांच्या आदेशानूसार दिनांक 09.07.2025 रोजी सकाळी ७:३० वाजता लाल नाला धरणाचे २ दरवाजे १० से.मी. ने उघण्यात येत आहे व विसर्ग 9.38 घनमीटर प्रती सेकंद सोडण्यात येत आहे तरी आपल्या स्तरावरून लाल नाला, पोथरा नदि, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. ML/ML/MS