वर्धा नदीवरील पूल बनला धोकादायक, पुलाला मध्येच पडलाय खड्डा…

चंद्रपूर दि ११:–चंद्रपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्दळीच्या भोयेगावच्या कमकुवत पुलाने वाहनधारक चिंतेत पडले आहेत. यापुलाला मध्येच खड्डा पडलाय त्यामुळे वाहने संथगतीने जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉरला या मार्गावरील हा पूल जोडतो. मात्र बांधकाम विभागाचे पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष आहे. यंदा या पुलावरून केवळ एकदा पाणी चढले आहे. मात्र आगामी काळात अधिक पावसाची शक्यता असल्याने पूलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ML/ML/MS