अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले…

अमरावती दि २८ — अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या येव्याच्या परीगणना नुसार अप्पर वर्धा प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. प्रकल्पाच्या धरण परिचालन सूचीनुसार नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे 3 वक्रद्वार 10 सेमी ने उघडण्यात आले आहे. त्यामधून 48.25 घ.मी.प्र.से एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये. वर्धा नदी पात्रामध्ये मासेमारी करण्यात येऊ नये.
जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन दक्ष राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.ML/ML/MS