वनतारा वाईल्डलाईफचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, केली परीसराची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वन्यजीव बचाव आणि संवर्धन केंद्र, वनताराचे उद्घाटन ४ मार्च रोजी केली. वनतारामध्ये सध्या दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक प्राण्यांची काळजी घेतली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनतारा येथील प्राण्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.तसेच वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध प्रजातींच्या सिंहाच्या पिल्लांशी खेळले. त्यामध्ये आशियाई शावक, पांढरे सिंह शावक, कॅराकल शावक आणि ढगाळ बिबट्या शावकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी येथील अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांबद्दल जाणून घेतलं, दुर्मिळ प्रजातींशी संवाद साधला, जीवनरक्षक शस्त्रक्रिया पाहिल्या आणि प्रमुख संवर्धन प्रयत्नांमध्ये भाग घेतला.