*मिरज मधील वानलेस हॉस्पिटल सुरू करणे हेच आमचे मिशन

 *मिरज मधील वानलेस हॉस्पिटल सुरू करणे हेच आमचे मिशन

सांगली प्रतिनिधी ~ सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वाणलेस रुग्णालय हे सांगली जिल्ह्यात मिशन रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे.ते रुग्णालय मागील काही वर्षांपासून बंद आहे.त्यामुळे या रुग्णालयातील कामगारांची वेतनाविना उपासमार होत आहे.डॉक्टरांना काम नाही.येथील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात देण्यासाठीय वानलेस रुग्णालय सुरू करणे काळाची गरज आहे. वानलेस हॉस्पिटल सुरू करणे हेच आमचे मिशन आहे असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
मिरज येथील वानलेस रुग्णालयाला केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली तसेच डॉक्टर आणि कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वानलेस रुग्णालयाचे नियोजित उद्घाटन धर्मदाय आयुक्तांच्या आदेशामुळे रद्द करण्यात आले असून धर्मदाय आयुक्तांच्या समोर या रुग्णालयाचा विश्वस्त व्यवस्थेतील वाद मिटल्यानंतर वानलेस रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येईल. रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांच्या नेतृत्वातील टीम वानलेस रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी करीत असलेले काम प्रशंसनीय आहे.नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी कंपनी चे व्यवस्थापन वानलेस रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी वानलेस रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. वानलेस रुग्णालय सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सुरू करू असा निर्धार ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी विचारमंचावर डीक्कीचे प्रमुख पद्मश्री मिलिंद कांबळे; आसाम मधून आलेले अल्फा संघटनेचे प्रमुख अनुप सेठिया ;जनसुराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समीत कदम; रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड; अण्णा वायदंडे; परशुराम वाडेकर; सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात; संजय कांबळे; उत्तम दादा कांबळे; श्वेतपद्म कांबळे; डॉ विजय मोरे; वानलेस रुग्णालय सुरू करण्याची मोहीम हाती घेतलेले रिपब्लिकन नेते विनोद निकाळजे आणि त्यांच्या पत्नी सौ अरुणा निकाळजे ; हितेश शिंदे; बिशप अँड्र्यू राठोड; बिशप आर ए सावळे; डॉ प्रभा कुरेशी; कामगारनेते सतीश वायदंडे; नाना वाघमारे; लाला वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *