कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आज ‘वंदे भारत’ रेल्वेची चाचणी
सांगली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चीत हुबळी – मिरज – कोल्हापूर – मिरज पुणे वंदे भारत 15 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर या वंदेभारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी मिरज जंक्शन मध्ये डीआर एम इंदू दुबे, ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग, सीनियर डी एम इ दीपक खोत, सीनियर डी एम इ विजयसिंह दरस, स्टेशन मास्तर डी टी तांदळे, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांच्यासहित रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
यापूर्वी हुबळी ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आणि परत कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू होणार होती. मात्र कोल्हापूर मधून थेट ही रेल्वे सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती. प्रवाशाची ही मागणी मान्य झाली असून आठवड्यातून तीन वेळेला हुबळी ते पुणे आणि तीन वेळेला कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत रेल्वे धावणार आहे.
ML/ML/SL
14 Sept 2024