लवकरच धावणार वंदे भारत स्लिपर ट्रेन

भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या यशस्वी प्रवासानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की ही ट्रेन सप्टेंबर २०२५ पासून धावणार आहे. ही ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात आरामदायक झोपेची सुविधा मिळणार आहे. १६ वातानुकूलित कोच, ज्यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी सेकंड टियर आणि एसी थ्री टियर असे तीन प्रकार असतील, तर एकूण १,१२८ प्रवाशांची क्षमता असेल.
टच-फ्री बायो-वॅक्यूम टॉयलेट, सीसीटीव्ही सुरक्षा, चार्जिंग पोर्ट, मॉड्युलर पॅंट्री, आणि अटेंडंट बटन यांसारख्या आधुनिक सुविधा
‘कवच’ सुरक्षा प्रणाली आणि एंटी-क्लाइंबिंग टेक्नोलॉजी यामुळे अपघात टाळण्याची क्षमता वाढेल
ही ट्रेन बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) ने इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तयार केली आहे आणि तिचा ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना लांब प्रवासात अधिक आरामदायक आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे.