‘वंदे साधारण’ ट्रेन मुंबईत दाखल
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत या अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून प्रवास अधिक आरामदायकही झाला आहे. मात्र या ट्रेन्सचे तिकिट खुूप जास्त आहे, ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही अशी टिका गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांतून सुरु होती. यावर उपाय म्हणून सरकार आता सर्वसमान्यांच्या आवाक्यातील ‘वंदे सर्वसाधारण एक्सप्रेस’ सुरु करणार आहे.
भगव्या आणि करड्या रंगातील ही नवीकोरी ट्रेन चेन्नईच्या ICF फॅक्टरीच्या चाचणीत यशस्वी होऊन मुंबईत दाखल झाली आहे.
या ट्रेनला २२ डबे असून यातून १८०० प्रवासी प्रवास करू शकतात. या गाडीचा वेग ताशी १३० किमी असणार आहे.
दरम्यान आता या ट्रेनची पुणे-मुंबई आणि कसारा-इगतपूरी या घाट मार्गांवर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच ही ट्रेन सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल.
SL/KA/SL
30 Oct. 2023