वंचितच्या शिर्डीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

 वंचितच्या शिर्डीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

शिर्डी दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले.

शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झालं असल्याचे बोलले जाते. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.

रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन उत्कर्षाताई रूपवते यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

SW/ML/SL

7 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *