‘ वंचित ‘ ने काँग्रेसला दिला नवीन प्रस्ताव, म्हणाले आम्ही तुमच्या सोबत

अकोला, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीत महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खर्गे यांना विनंती केली आहे की महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत.
वंचित बहुजन आघाडी तुमच्या पसंतीच्या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रकारचा आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे.
ML/ML/SL
19 March 2024