आता वाळू,रेतीची वाहतूक चोवीस तास…

मुंबई दि ३ — वाळू आणि रेती वाहतुकीसाठी आता चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली.
याआधी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत इतर गौण खनिजांची वाहतूक परवानगी होती. वाळू, रेती वाहतुकीसाठी मात्र बंदी होती, त्यामुळे डेपोतील वाळू साठा तसाच पडून राहत होता आणि रस्त्यात अनधिकृत वाहतूक ही सुरू होती. त्यावर उपाय म्हणून आता सायंकाळी सहा नंतर वाहतूक परवाना महाखनिज या पोर्टलवरून देण्यात येईल असं मंत्री म्हणाले.

नवीन वाळू धोरणामुळे राज्यात सर्वात जास्त शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न चंद्रपूर जिल्ह्यात मिळालं आहे. आता घरकुलांना तहसीलदारांमार्फत पाच ब्रास वाळूची रॉयल्टी घरपोच दिली जात आहे. मात्र वाहतूक घरकुल बांधणाऱ्या व्यक्तीला करावी लागते, त्याचे पैसे कोण देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यावर याच अधिवेशनात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिली. ML/ML/MS