मोक्का लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, १५ दिवसांची कोठडी
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला कोर्टाने आज पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी सीआयडीकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सीआयडीकडून सांगण्यात आल्याचे समजते. केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यास आज बीड येथील तुरुंगात नेलं जाईल. येथेच वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर, सीआयडीने अर्ज केल्यानुसार उद्या मोक्का अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल.