वाल्मिक कराडला मिळाली न्यायालयीन कोठडी
बीड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हत्येचा कट रचल्याचा आरोपाखाली एसआयटी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली होती. त्यामुळे एसआयटीने आज त्याला न्यायालयात हजर केले. (Sit) एसआयटीनेच न्यायालयाकडे एमसीआर मागीतल्याने विशेष मकोका न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी वाल्मिक कराडची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड यांना (beed) बीडच्या कारागृहात पाठविण्यात येणार आहे. त्याच्या पुन्हा कोठडीची आवश्यकता भासेल त्यावेळी ती मागितली जाईल असे सीआयडी ने स्पष्ट केले आहे.
ML/ML/SL
22 Jan. 2025