व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले
सांगली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले आहेत. स्थानिक बाजारपेठेत वीस फुलांचा गुच्छाचा दर 50 रुपयावरून 100 ते 125 रुपयांवर पोहचला आहे. मिरज पूर्व भागातील गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. मिरजेतून रेल्वेने मुंबई आणि दिल्लीला गुलाबाची निर्यात होते, यंदा मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे, गुलाबाच्या निर्यातिला फटका बसत आहे. दर वेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते, आता मात्र केवळ 50 बॉक्सच निर्यात केले जात आहेत.
14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असतो. प्रेमाचे प्रतिक अशी गुलाबाची ओळख आहे. व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरात तेजी निर्माण होते. दरवर्षी मिरजेतून मुंबई, दिल्लीत फुलांची निर्यात होते. दररोज पाठविण्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलांचा दिल्ली आणि मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो. वीस फुलांचा एक गुच्छ असतो. वीस गुच्छ हे एका बॉक्समध्ये असतात. एका बॉक्स मध्ये 400 गुलाबाची फुले असतात. मिरजेतून यापूर्वी दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाबाची फुले मुंबई आणि दिल्लीला जात होती. यंदा ही फुलांच्या दरात वाढ झाली, असली तरी निर्यातीमध्ये मात्र घट झाली आहे. दर वेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते, आता मात्र केवळ 50 बॉक्सच निर्यात केले जात आहेत.
एरवी वीस फुलांचा एक गुच्छ पन्नास रुपयेला मिळतो, तो व्हॅलेंटाईन डे मुळे 100 ते 125 रुपयांना स्थानिक बाजार पेठेत मिळत आहे. एकीकडे दर वाढला असला तरी दुसरीकडे निर्याती मध्ये घट झाली आहे. प्लास्टिकच्या फुलांच्या मुळे मिरजेतून होणाऱ्या निर्यातीला फटका बसत आहे. जर नेहमी प्रमाणे निर्यात झाली असती, तर फुलांच्या दरात आणखीन वाढ झाली असती. एक तर उत्पादन खर्च वाढलेला आहे, वाहतूक दर वाढलेली आहे, शिवाय लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकरी अडचणीत येतात. व्हॅलेंटाईन डे यावेळीच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फुलाचा चांगला दर मिळण्याची आशा असते. मात्र प्लास्टिकच्या फुलांचे आव्हान नैसर्गिक फुलांच्या समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. प्लास्टिकची फुले बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
ML/KA/PGB 12 Feb 2024