न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न
मुंबई, दि १०
वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे खजिनदार मा.रामदास धाडवे साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.गंगाधर साळवी सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महिलांविषयी आदर व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. मुलींनी आम्ही सबला आणि सक्षम आहोत या विषयावर मत मांडले. विद्यालयातील शिक्षिका सौ.अश्विनी घरटकर मॅडम आणि कुमारी मीनाक्षी राऊत मॅडम तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी रिद्धी सुनील धाडवे यांचे यथोचित सन्मान करण्यात आले. शालेय परिसरात विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री.गंगाधर साळवी सर यांनी मनोगतात इतिहासात होऊन गेलेल्या आणि आता सध्या कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव केला व या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रिया निवाते हिने केले तर आभार मीनाक्षी राऊत मॅडम यांनी मानले. श्री दीपेश जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. लिपिक श्री बर्वे एस एस, गायकवाड एस के आणि विद्यार्थी उपस्थित होते. गीतामंचातील विद्यार्थिनींनी महिलादिनाचे गीत गायन करून कार्यक्रम सांगता केली.KK/ML/MS