पवार राजीनामा नाट्याने वज्रमूठ सभा धोक्यात

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याची घोषणा केल्यानंतर त्या पक्षात खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे मविआ च्या वज्रमूठ सभा धोक्यात आल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
पवारांनी घोषणा केली आणि राष्ट्रवादी मध्ये निर्माण झालेले वादळ लवकर शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या पक्षाची एक बैठक येत्या पाच किंवा सहा तारखेला होऊन त्यात पवारांच्या राजीनाम्यावर निर्णय अपेक्षित आहे. अर्थात हा निर्णय स्वतः पवारच घेणार असले तरी त्यावर पक्षात शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पार पाडावी लागेल.Vajramooth meeting threatened by Pawar’s resignation drama
दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या नियोजित वज्रमूठ सभांचे आधी जाहीर झालेले वेळापत्रक कोलमडले असून आता फक्त २८ मे ची कोल्हापूर आणि ११ जूनची अमरावतीची सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. या सभा देखील होतील की नाही याबाबत संभ्रम आहे. आजची आघाडीच्या नेत्यांची परस्पर विरोधी विधाने हा संभ्रम निर्माण करीत आहेत.
वाढत्या उन्हाच्या वेळी अशा सभा घेण्याबाबतची साशंकता खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली तर असेच काहीसे वक्तव्य काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केले मात्र नियोजित वेळेप्रमाणे त्या होतीलच असे कोणीही म्हटलेले नाही. संजय राऊत यांनी कोल्हापूरची सभा होईल आणि पावसानुसार बाकीच्या सभांचा विचार करू असे म्हटले. मात्र येत्या १५ तारखेला बारामती येथे होणाऱ्या सभेचे आयोजन अजित पवार यांच्या कडे होते त्याचे काय याचे उत्तर कोणीही देताना दिसत नाही यामुळेच या सभा धोक्यात आल्याचे दिसत आहे.
ML/KA/PGB
3 May 2023