वैदेही सरोदे वर यांनी केले कौतुकाचे वर्षाव..

दिल्ली, दि ३१
इटली येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये रोलर डर्बी या क्रीडाप्रकारात भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटर वैदेही सरोदे हिची खासदार संजय दीना पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेतली.

खासदार संजय पाटील यांनी तिचे कौतुक केले व क्रिडा क्षेत्रातील तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.ML/ML/MS