वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत

 वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या निवडणूका होऊन १० दिवस उलटले तरी अजूनही भा.ज.प. नेता निवडू शकलेली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालांनंतर बहुमतवाला पक्ष नेता निवड करतो. त्यांनतर सदर नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करतात आणि त्यांनतर शपथविधी होतो.

महाराष्ट्रात प्रथा तर सोडाच पण ही प्रक्रियाही सुरु होण्यापूर्वीच भा.ज. प. चेच अध्यक्ष शपथविधीची तारीख जाहीर करतात. ह्यातून एकाधिकारीशाही, संविधानाची पायमल्ली, लोकशाही प्रथांचे विसर्जन याचे प्रतिबिंब दिसून येते. ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. थोडक्यात, भा. ज. प. चा गेल्या आठ दिवसातील कारभार म्हणजे हॉल बुक केला आहे , म्हणून आता वधू वर शोधायचा, “जावई निवडीपूर्वीच रुसलेले” अश्यातला प्रकार असल्याची उपरोधक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

ML/ML/PGB 3 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *