वादळ वाऱ्यामुळे असंख्य पोपटांचा मृत्यू !

 वादळ वाऱ्यामुळे असंख्य पोपटांचा मृत्यू !

यवतमाळ , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह आणि गारपिटीसह काल पाऊस झाला .या पावसाचा मारा इतका जबरदस्त होता की झाडावर विसावलेले असंख्य पोपट मृत्युमुखी पडले. तर काही पोपट झाडावरून खाली कोसळले. ही बाब स्थानिक पक्षी मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या तडफडणाऱ्या पोपटांना उचलून त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले .त्यापैकी अनेक पोपटांना परत रानात सोडून देण्यात आले . तर उर्वरित पोपटांना आज सायंकाळी सोडण्यात येणार आहे. याच सोबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेकांची घरं , दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत .शेतीचेही मोठे नुकसान आहे झालं आहे.दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे लोकांचे हाल झाले.

ML/KA/PGB 28 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *