जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव १३ व्या स्थानी

 जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव १३ व्या स्थानी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील सर्वसामान्यांचे आवडते स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. धावपळीच्या आयुष्यात अनेकांच्या पोटाला आधार देणारा आणि खिशाला परवडणारा आपला आवडता चटकदार वडापाव आता जागतीक क्रमवारीत जाऊन पोहोचला आहे. जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव १३ वे स्थान मिळाले आहे.

टेस्ट अॅटलास (Taste Atlas) या संस्थेने जगातील सर्वश्रेष्ठ खाद्यपदार्थांची रॅंकीगसाठी सर्वे केला आहे. ही संस्था फूड क्रिटिक्सकडून रिव्ह्यू घेते. सोबतच रिसर्च पेपर्सच्या मदतीने पारंपारिक पद्धतीने बनलेल्या व्यंजनाच्या अस्ल रेसिपीसना रँकिंग देते. विशेष म्हणजे या 50 पदार्थांमध्ये दोनच शाकाहारी पदार्थ आहे. त्यापैकी एक वडापाव आहे.

टेस्ट अॅटलासच्या रँकिंगमध्ये तुर्कीची टॉम्बिक ही डिश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पेरुची डिश बुटिफारा आणि अर्जेंटिनाची सँडविच डे लोमो यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे. Taste Atlas च्या वेबसाईटवर वडापावची जन्मकथा आणि रेसिपी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SL/KA/SL

5 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *