शरद पवार यांच्या विचारांचे निर्जंतुनिकरणं करण्यासाठी राज्यभर लसीकरण सभा

 शरद पवार यांच्या विचारांचे निर्जंतुनिकरणं करण्यासाठी राज्यभर लसीकरण सभा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरद पवार यांच्या विचारांचे निर्जंतुनिकरणं करण्यासाठी राज्यभर लसीकरण सभा व बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.याची सुरुवात दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ फोडून व चैत्यभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनाने होणार आहे, अशी माहिती एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे अध्यक्ष डॉ.गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शरद पवार यांना शह देण्यासाठी एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनल तर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.

दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात ५० शाखांत मिळून एकूण ९० हजार सभासद आहेत. एसटीचे राजकारणात बँकेचे विशेष महत्त्व असल्याने सर्वपक्षीय कामगार संघटनांमध्ये बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच आहे.या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाचे वर्चस्व आहे.पवारांची आर्थिक नाडी असलेल्या या बँकेत निवडणूक काळात गडबड होण्याची भीती सदावर्ते यांनी बोलून दाखवली.
आज पर्यत या बँकेवर एसटी चालक,वाहक व मेकॅनिकल कधी ही अध्यक्ष म्हणून निवडून आले नाहीत.त्यांच्यावर कायम अन्याय झाला. तो अन्याय दूर करण्यासाठी एसटी चालक,वाहक व मेकॅनिकल यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनल शरद पवार यांची कृती व विचार हे व्हायरस स्वरूप, त्यांच्या विचारांचे निर्जंतुनीकरण करण्यासाठी राज्यभरात लसीकरण सभा व रॅली काढण्यात येणार आहे.सातारा,कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई,नागपूर, चंदपूर, अमरावती ,अकोला, बुलढाणा, संभाजीनगर,नाशिक, व सोलापूर या जिल्ह्यात ही रॅली काढण्यात येणार आहे.अशी माहिती ऍड. सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.Vaccination meetings across the state to sterilize Sharad Pawar’s views

ML/KA/PGB
12 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *