सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

सॅन फ्रान्सिस्को, दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (73) यांचे आज निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.
झाकीर हुसेन यांनी काही सिनेमांमध्ये काम केले आहे. 1983 मध्ये आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. शशी कपूर यांनीही या चित्रपटात काम केले होते.झाकीर हुसैन यांनी 1998 साली आलेल्या ‘साज’ चित्रपटात त्यांनी शबाना आझमी सोबत काम केले होते.
आझमी होत्या. या चित्रपटात झाकीर हुसैन यांनी शबानांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती.मुघल-ए-आझम (1960) या चित्रपटात झाकीर हुसैन यांनाही सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मंजूर केले नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती.
SL/ ML/ SL
15 Dec. 2024