पिकांवरील कीड, रोग सर्वेक्षणासाठी वापरा कृषी मंत्रालयाचे एनपीएसएस App

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी मंत्रालय सातत्याने प्रयत्नशील असते. बदलते हवामानमुळे सध्या पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांमुळे त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारव्दारे राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षण करण्यासाठी (NPSS) ॲप विकसित करण्यात आले आहे. कापूस, मिरची, मका, भात व आंबा या पिंकावरील कीड- रोगांची माहिती यावर संकलित करता येणार आहे.
या प्रणालीमध्ये NPSS ॲप डाउनलोड करून शेतकऱ्यांनी स्वत: पिकावरील किडीची निरीक्षणे ॲपवर नोंदविल्यास त्यावरील उपाय योजना शेतकऱ्यांना मोबाइलवर तत्काळ उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी एनपीएसएस अॅपचा वापर करण्याचे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थंकर यांनी केले आहे. या ॲपमध्ये विभागातील प्रमुख पिकांचा टप्प्याटप्प्याने समावेश होणार आहे.
शेतकऱ्यांना पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कमी खर्चात उत्तम नियंत्रण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना ॲपच्या माध्यामातून सुचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलवरून गुगल प्ले स्टोअरमधून एनपीएसएस ॲप डाउनलोड करून या प्रणालीचा वापर करावा.
SL/KA/SL
16 Dec. 2023