66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिका घेणार काढता पाय

 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिका घेणार काढता पाय

वॉशिग्टन डीसी, दि. 8 : स्वतःला जगाचे तारणहार समजत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी अमेरिका आता तब्बल ६६ आंतराष्ट्रीय संघटनांमधुन बाहेर पडणार आहे. World Health Organization (WHO), United Nations Framework Convention on Climate Change (UNFCCC), Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) या अमेरिका बाहेर पडत असलेल्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत. अमेरिका फर्स्ट या धोरणचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता जगातील अन्य देशांना सहकार्य करण्याचे थांबवून आपल्या देशाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याचा हा एक भागही म्हणता येऊ शकतो.

66 संस्थांमध्ये 35 गैर-संयुक्त राष्ट्र (UN) संघटना आणि 31 संयुक्त राष्ट्र संस्थांचा समावेश आहे. व्हाईट हाऊस आणि स्टेट डिपार्टमेंटनुसार, या संघटना अमेरिकेच्या हिताच्या विरोधात आहेत. यात पैशांचा अपव्यय होतो. याशिवाय, त्या अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने चालवल्या जात आहेत. या पावलाला ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा भाग मानले जात आहे, जे जागतिक संस्थांपासून दूर राहण्यावर भर देते.

ट्रम्प यांनी जानेवारी 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. WHO च्या सदस्यत्वातून बाहेर पडण्यासाठी एक वर्षाचा नोटीस कालावधी आवश्यक असतो. 22 जानेवारीनंतर अमेरिका WHO चा सदस्य राहणार नाही.

ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र टीका होत आहे. जो बायडेन प्रशासनाच्या माजी हवामान सल्लागार जीना मॅकार्थी यांनी याला कमकुवत विचारसरणीचा, लाजिरवाणा आणि मूर्खपणाचा निर्णय म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी निवेदन जारी केले की, हे करार अमेरिकेच्या प्रगतीशी संबंधित आहेत. यांचा अर्थव्यवस्थांवर आणि लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे.

रुबियो म्हणाले की, या संघटनांमधून बाहेर पडण्याचे पाऊल हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांशी केलेल्या वचनपूर्तीचे द्योतक आहे. जे नोकरशहा आमच्या हिताच्या विरोधात काम करतात, त्यांना आम्ही आर्थिक मदत देणे बंद करू. ट्रम्प प्रशासन नेहमी अमेरिका आणि अमेरिकन लोकांना प्राधान्य देईल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *