अमेरिका परदेशी वाहनांवर 25% कर लादणार

वॉशिग्टन डीसी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेत आल्या दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारून त्याचा धडाकेबाज अवलंब सुरु केला आहे. देशातील नोकऱ्या आणि उद्योगधंदे यामध्ये अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ते दररोज कठोर निर्णय घेत आहेत. देशात बेकायदा वास्तव्याला असणाऱ्या परदेशस्थांना त्यानी उचलबांगडी केली आहेत. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाला चालना देण्यासाठी ट्रम्प सरकारने परदेशी वाहनांवर २५ टक्के कर आकारण्याचे निश्चित केले आहे.
ट्रम्पचा दावा आहे की या निर्णयामुळे अमेरिकेतील उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. व्हाईट हाऊसला आशा आहे की यामुळे दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सचा महसूल वाढेल. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. मात्र या निर्णयामुळे काल अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्सचे शेअर्स ३% घसरले. त्याच वेळी, जीप आणि क्रायस्लरची मूळ कंपनी स्टेलांटिसचे शेअर्स देखील सुमारे ३.६% ने घसरले.
ट्रम्प यांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे अमेरिकेत नवीन कारखाने उघडतील. कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये बनवलेले विविध ऑटो पार्ट्स आणि तयार वाहने आता अमेरिकेत बनवता येतील. ट्रम्प म्हणाले आहेत की त्यांचा निर्णय कायमचा आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांच्या शुल्क लादण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, हा आमच्यावर थेट हल्ला आहे, आम्ही आमच्या कामगारांचे आणि कंपन्यांचे रक्षण करू.
SL/ML/SL
27 March 2025