अमेरिकन सेनेटने मंजूर केले समलैंगिक विवाह संरक्षण विधेयक

 अमेरिकन सेनेटने मंजूर केले समलैंगिक विवाह संरक्षण विधेयक

मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पारंपरिक विवाह संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे होताना दिसून येत आहेत. समलैंगिक  विवाहाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात झालेली विशेष घटना म्हणजे Same-sex marriage bill passed in America समलिंगी विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकन सिनेटने मंगळवारी (दि.29) मंजूर केले. या विधेयकामुळे समलिंगी जोडप्यांना फेडरल संरक्षण मिळणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत  समलैंगिकता  जाहीर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा विवाहाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी कायद्याची लढाई सुरू होती. समलिंगी विवाह विधेयक सिनेटमध्ये मंजूर करण्यासाठी डेमोक्रॅट्सना खूप संघर्ष करावा लागला. 100 सदस्यीय सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सच्या 50 जागा आहेत आणि ते मंजूर करण्यासाठी त्यांना किमान 10 रिपब्लिकन मतांची आवश्यकता होती. या विधेयकाच्या बाजूने 61 तर विरोधात 36 मते पडली. सिनेटमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर ते पुन्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जाणार आहे.

याबाबत राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रेम हे प्रेम असतं आणि अमेरिकन लोकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार असावा. यूएस सिनेटनं मंजूर केलेलं विधेयक समलैंगिक विवाहास फेडरल मान्यता संरक्षित करेल. 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरात त्यावर बंदी घातली होती. पण आता हे विधेयक सुनिश्चित करेल की, समलैंगिक आणि आंतरजातीय विवाह यूएस फेडरल कायद्यात समाविष्ट आहे.”

दरम्यान भारतातही विशेष विवाह कायदा १९५४’ अंतर्गत देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी जोडप्यांनी सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दोन याचिका दाखल केल्या आहेत. यावर  सर्वोंच्च न्यायालयाने   केंद्र सरकारला आणि  अ‍ॅटर्नी जनरल यांना  समलैंगिक विवाहाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

SL/KA/SL

30 Nov. 2022

US Senate passed the same-sex marriage protection bill

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *