अमेरिकेने भारतावर लादला 27% जकात कर

 अमेरिकेने भारतावर लादला 27% जकात कर

वॉशिग्टन डीसी., दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लागू केलं आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. दरम्यान, भारतावरील आयात शुल्क हे २६ टक्के नसून २७ टक्के असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून हे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतावर २६ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आलं होतं. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की भारतावर अमेरिकेने २७ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे.अमेरिकेने सुमारे ६० देशांवर त्यांच्या करांच्या तुलनेत निम्मा कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केसे आहे की,आज अमेरिकेसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस आहे. आपल्याला अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे आहे. आम्ही परस्पर शुल्क जाहीर करत आहोत, म्हणजेच देश आपल्यावर जे काही शुल्क लादत आहे, तेच आम्ही त्यांच्याशी करू.भारत अमेरिकेवर ५२% पर्यंत कर लादतो, म्हणून अमेरिका भारतावर २७% कर लादेल. इतर देश आमच्याकडून जे शुल्क आकारत आहेत त्याच्या जवळपास निम्मे शुल्क आम्ही आकारू. त्यामुळे दर पूर्णपणे परस्परसंवादी नसतील. मी ते करू शकतो, पण ते अनेक देशांसाठी कठीण होईल. आम्हाला हे करायचे नव्हते.

SL/ML/SL

3 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *