अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ

नवी दिल्ली, दि. ३० : अमेरिकेने भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होणार आहेत. त्याचा परिणाम भारताच्या व्यापाऱ्यावर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये सारं काही आलबेल नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. खरंतर भारत-अमेरिका संबंध ताणण्यामागे गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडी कारणीभूत आहेत.
“भारत हा आपला मित्र देश असला तरी, आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यावसाय केला आहे. त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर-आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलं आहे. ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, चीनसह, ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहे. हे सर्व काही चांगले नाही. त्यामुळे भारताला 1 ऑगस्टपासून 25 टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल”, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध हे आपल्यामुळे थांबलं, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण भारताने ते नाकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच लोकसभेत कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरुन आपण निर्णय घेतना नाही, असं म्हटलं. यानंतर आज अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारले जाणार आहे.
SL/ML/SL