अमेरिकेत विदेशी ट्रक चालकांवर बंदी

मुंबई, दि. २२ : अमेरिकेने सर्व परदेशी ट्रक चालकांना व्हिसा देणे तात्काळ थांबवले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काल (दि. 21) रोजी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आम्ही तात्काळ प्रभावाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी वर्कर व्हिसा जारी करण्यावर बंदी घालत आहोत.” हा निर्णय हरजिंदर सिंग नावाच्या एका भारतीय नागरिकाने केलेल्या चुकीमुळे घेण्यात आला आहे. जो अवैध मार्गाने अमेरिकेत घुसला होता आणि त्याच्यामुळे झालेल्या अपघाताने 3 लोकांचा जीव गेला होता. एका भारतीयामुळे अमेरिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. अमेरिकेने सर्व परदेशी ट्रक चालकांना व्हिसा देणे तात्काळ थांबवले आहे.
अमेरिकेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या विदेशी ट्रक चालकांमुळे अमेरिकेतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, तसेच स्थानिक ट्रक चालकांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे, असे रुबियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचे मुख्य कारण फ्लोरिडा येथे झालेला एक मोठा अपघात आहे.
हरजिंदर सिंग नावाचा व्यक्ती एका मोठ्या ट्रक-ट्रेलरसह रस्त्यावर अवैध ‘यू-टर्न’ घेत होता, ज्यामुळे मागून येणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील 3 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हरजिंदर सिंगवर वाहन चालवताना हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
SL/ML/SL