उर्मिला मातोंडकर घेणार घटस्फोट

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आठ वर्षांपूर्वी मोहसीन अख्तर मीर याच्याबरोबर लग्न केल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता उर्मिला आणि मोहसीन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. ते सध्या विभक्त राहात आहेत लग्नाच्या 8 वर्षानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. आता लग्नाच्या ८ वर्षांनी त्यांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिला व मोहसिन या दोघांनीही याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही.