*उरण तालुक्यात प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र यांच्या न्यायहक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन

मुंबई प्रतिनिधी – उरणमधील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय याचा मनस्वी आनंद आहे शिवाय पक्षपातळीवर साथ राहिलच पण उरण तालुक्यात प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र यांच्या न्यायहक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.
उरण ( रायगड) येथील शरदचंद्र पवार गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
उरणचे माजी तालुकाध्यक्ष मनोज भगत, कार्याध्यक्ष रमन कासकर, संघटक प्रकाश म्हात्रे, पक्षप्रवक्ते अजित पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष मच्छिंद्र ठाकूर, शहराध्यक्ष मंगेश कांबळे, युवक अध्यक्ष अक्षय ठाकूर, संजय तांडेल, नामदेव मढवी, उरण उपाध्यक्ष राजेश म्हात्रे, भूषण ठाकूर, निलेश पाटील, दिपक पाटील, लिलेश्वर भगत आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर उपस्थित होते.