राजधानीच्या भूजलात सापडले युरेनियम, सार्वजनिक आरोग्य धोक्यात
नवी दिल्ली, दि. ३ :
राजधानी नवी दिल्लीच्या वायू प्रदूषणात दिवसेंदिवस धोकादायक वाढ होत असल्याच्या बातम्या दररोजच समोर येत असतात. राजधानीतील यमुनानदी आणि अन्य जलस्त्रोतही प्रचंड दुषित झाले आहेत. त्याच अजून एका धक्कादायक प्रदुषणाची भर पडली आहे. दिल्लीतील भूजलामध्ये धोकादायक प्रमाणात युरेनिअम आढळून आले आहे.
दूषित नमुन्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा नंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. काही प्रमुख अहवालानुसार, केंद्रीय भूजल मंडळाने तयार केलेला नवीनतम वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२५ काही स्पष्ट चित्र दर्शवितो. दिल्लीत चाचणी केलेल्या १३ – १५ % नमुन्यांमध्ये ३० ppb अर्थात (अब्ज भागांमध्ये एखाद्या पदार्थाचे किती भाग आहेत हे दर्शवणे) तर याच ppbच्या अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त युरेनियम आहे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्यात युरेनियम, आर्सेनिक आणि शिसे यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मूत्रपिंडाचे विकार, न्यूरोलॉजिकल नुकसान, कंकाल विकृती आणि कर्करोगाचा धोका अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. या युरेनियममुळे भूजलाची पिण्याची क्षमता कमी होते आणि माती आणि पिकांमध्ये विषारी पदार्थ साचून शेतीलाही नुकसान पोहचू शकते.
CGWB ने २०२४ च्या पूर्व आणि पावसाळ्यानंतरच्या कालावधीत देशभरातील ३,७५४ भूजल नमुन्यांची चाचणी केली होती. त्यात असे आढळून आले की ६.७१% मान्सूनपूर्व नमुन्यांमध्ये आणि ७.९१ % पावसाळ्यानंतरच्या नमुन्यांमध्ये युरेनियम सुरक्षित मर्यादेपेक्षा हे अधिक जास्त आहे, ज्यामध्ये पावसानंतर यामध्ये थोडीशी वाढ दिसून आली. पंजाबमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे, आणि पंजाब पाठोपाठ हरियाणा आणि दिल्लीचा क्रमांक येतो.
या अहवालात भूजलसोबतच एक प्रमुख मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे प्रदूषणाचा या अहवालात प्रदूषणाची पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले आहे. २०२० मध्ये केलेल्या तपशीलवार मूल्यांकनात ११.७% नमुन्यांमध्ये उंबरठ्याच्या वरचे युरेनियम आढळले आणि दिल्लीच्या सर्वोच्च रीडिंगपैकी एक नोंदवले गेले आल्याची माहिती आहे. यामुळे युरेनियम दूषिततेच्या बाबतीत दिल्लीला देशातील सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये स्थान मिळाले आहे.
या सगळ्या निष्कर्षांमुळे पर्यावरणीय गटांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे. भूजलामध्ये नायट्रेट, फ्लोराईड आणि खारटपणा तसेच युरेनियमची उच्च पातळी हि अधिक चिंताजनक आहे,याचमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
SL/ML/SL