स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी विधानसभेत गदारोळ

 स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याचा मुद्दा सत्तारूढ सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला त्यावर सत्तारूढ सदस्य च आक्रमक झाले, जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा तहकूब झालं.Uproar in the Legislative Assembly in the case of Savantryan Veer Savarkar

प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला, संजय शिरसाट यांनी त्याला अनुमोदन दिलं, आशीष शेलार यांनी गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली, यादरम्यान सत्तारूढ सदस्य जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, अध्यक्षा समोरील जागेत येऊन गदारोळ केला

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी सदस्य ही जागा सोडून पुढे आले, दोन्ही बाजूने पुन्हा गदारोळ झाला, कामकाज पुन्हा अर्धा तास तहकूब झालं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राहूल गांधी यांच्या फोटोला मारण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी केला ते रोखले गेले नाही , हे योग्य नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

राहूल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचं काम विधिमंडळ आवारात योग्य नाही, राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दल असं करणं योग्य नाहीत, अध्यक्षांनी याची दखल घ्यावी , असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पावले उचला अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या दरम्यान दोन्ही बाजूने गदारोळ सुरूच राहिला.

अशा पद्धतीने जोडे मारण्याचं आंदोलन विधिमंडळात होणं योग्य नाही, त्याची काळजी घेतली जाईल, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बोललं जातं ते अजिबात सहन करण्यायोग्य नाही , त्यांच्या त्यागाला अजिबात तोड नाही, त्यांच्या विरूध्द बोलण्याचा प्रयत्न निषेधार्ह च आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या असंसदीय घटनेची चौकशी केली जाईल, ते तपासून घेतलं जाईल, अशा पद्धतीचे काम कोणालाही करू देणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आणि कामकाज सुरळीत सुरु झालं.

ML/KA/PGB
23 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *