15 सप्टेंबरपासून वाढणार UPI पेमेंट मर्यादा
मुंबई, दि. ८ : डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून, विशेषतः व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ₹1 लाख प्रतिदिन राहणार आहे. डिजिटल खाते उघडणे यासाठीची मर्यादाही बदललेली नाही – ती अजूनही ₹2 लाख आहे.
जुनी मर्यादा – नवीन मर्यादा – दैनिक मर्यादा

विमा, कर्ज, शेअर बाजार, प्रवास, दागिने खरेदी यांसारख्या मोठ्या व्यवहार करणाऱ्यांना आता एका क्लिकवर अधिक रक्कम ट्रान्सफर करता येणार.
व्यापाऱ्यांना त्वरित सेटलमेंट मिळेल, ज्यामुळे व्यवहार अधिक वेगवान आणि पारदर्शक होतील.
या बदलामुळे भारतातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळणार आहे.