तोपर्यंत गौतम अदानी यांना धारावीत पाय ठेवू देणार नाही

 तोपर्यंत गौतम अदानी यांना धारावीत पाय ठेवू देणार नाही

मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क) : धारावी प्रकल्पाला आमचा विरोध नसून धारावीकरांचे धारावी मध्येच पुनर्वसन झाले पाहिजे, सर्वांना ४०५ चौरस फुटाचे निशुल्क घर द्या आणि ,धारावी पुनर्विकास प्रकल्पाला परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या ,अशी मागणी करत ,जो पर्यत धारावीतील रहिवाशांच्या मागण्या होत नाही तोपर्यंत गौतम अदानी यांना धारावीत पाय ठेवू देणार नाही,असा इशारा आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार आहे.

मात्र, धारावीतील रहिवाशांचा पुरेसा सल्ला घेण्यात आलेला नाही, परिणामी प्रकल्पाला विरोध होत आहे. पुनर्विकास आराखड्यात लघु उद्योग मालक आणि गृह-आधारित व्यवसायांसाठीच्या धोरणाबाबतही स्पष्टतेचा अभाव आहे. प्रकल्पात लोकप्रतिनिधी आणि विकास आराखड्यात पारदर्शकता आणावी, अशी धारावीतील नागरिकांची मागणी आहे. सध्याच्या परिस्थितीच्या आधारे असे दिसते की अदानी समूह रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांकडे लक्ष देणार नाही आणि त्यामुळे ‘अदानी हटवा, धारावी वाचवा’ ही आमची मागणी आहे. असे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे. अदानी समूहाला १० कोटी चौरस फूट विकास हक्क ५,०६९ कोटी रुपयांना मिळत आहेत. तसेच सरकारच्या पैशातून रेल्वेची अतिरिक्त जमीन मिळत आहे. या भागातील शेवटचे सर्वेक्षण २००८ मध्ये करण्यात आले होते आणि संरचनेची पात्रता तारीख १ जानेवारी २००० ठेवण्यात आली होती, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) नुसार ती २०११ आहे. जर सरकारला खरोखरच धारावीचा पुनर्विकास करायचा असेल तर नवीन सर्वेक्षण केले पाहिजे असे मत स्थानिक रहिवाशी व आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष संदीप कटके यांनी व्यक्त केले.

ML/KA/SL
24 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *