सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला अवकाळी पाऊस

सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात दुपारी ४ च्या नंतर काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिर्लोक, नारूर, माणगाव, वाडोस, पांग्रड, वेताळ बांबर्डे, पणदूर आदी गावांमध्ये हा पाऊस झाला.
या अवकाळी पावसामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. तसेच आंबा, काजू उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
SL/KA/SL
24 Nov. 2023