अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका

वाशिम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणी केलेल्या हळद पिकाचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या पावसाममुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून वाळत घातलेली हळद भिजली असून, या हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला चांगले दर मिळत असल्यानं शेतकरी हळदीची काढणी करून लवकर विक्री करत होते मात्र पावसामुळं आता विक्री लांबणार आहे तर दरही कमी मिळण्याची शक्यता आहे.
ML/ML/SL
30 March 2024