अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना फटका

 अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना फटका

अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची या पावसामुळे तारांबळ उडाली.

या बदलत्या हवामानामुळे पेणमधील आंबा बागायतदारांसह वीटभट्टी वाल्यांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी आंब्याला चांगल्या प्रकारचा मोहर आल्याने येणाऱ्या काही दिवसात आंब्याचा पीक बहारदार येईल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत होती मात्र या बदलत्या हवामानामुळे आणि अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्यावर भुरी, तुडतुडे तसेच मावा या रोगाची किड लागण्याची संभावना असून आलेला मोहोर खाली पडून आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होत आहे.

दुसरीकडे पेणमध्ये असणाऱ्या मोठ मोठे वीट भट्ट्या या अवकाळी पावसात भिजून वीटभट्टीचे हे नुकसान झाले आहे त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मध्येच पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसामुळे शहरातील व्यावसायिकांनाही फटका बसला आहे.

ML/KA/ML

21 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *