अवकाळी पावसाची हजेरी, घरांचे नुकसान- झाडे, खांब उन्मळून पडले

बुलडाणा, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काल सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये मलकापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या घुसर, शेलापुर गावातील अनेकांच्या घरावरचे टीनपत्रे उडून गेले .जवळपास अर्धा तास पाऊस पडल्यामुळे घरातील धान्यही पावसाने भिजवून गेले तर मलकापूर सोलापूर या महामार्गावरील शेलापुर, घुसर ,मलकापूर, या रस्त्यावरील झाडे आणि विद्युत पोल रस्त्यावर उन्मळून पडले आहेत. काल सायंकाळी झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे शेलापुर , घुसर या गावातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. अर्ध्या तासाच्या पावसाने होत्यांचं नव्हतं करून ठेवले, जोरदार वारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उन्मळून पडलेली झाडे आणि पडलेले विजेचे खांब… हा सर्व प्रकार झाल्यानंतर गाव अंधकारमय झाले होते. गावात मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे .
ML/KA/PGB 24 May 2023